Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फोन उचलला नाही म्हणून संताप; प्रेयसीच्या घरात घुसून तरुणाचा धिंगाणा
    क्राईम

    फोन उचलला नाही म्हणून संताप; प्रेयसीच्या घरात घुसून तरुणाचा धिंगाणा

    editor deskBy editor deskJune 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    चार वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधातून १९ वर्षीय तरुणीच्या घरात शिरुन संशयित तरुणाने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुचाकीच्या चावीने तरुणीच्या पाठीवर मारुन तिला जखमी केले. तसेच तरुणी कोणासोबत बोलते हे तीने सांगितले नाही तर संशयिताने तरुणीच्या घरातच फाशी घेवून तरुणीला मारुन टाकण्याची धमकी दिली. ही घटना दि. २ जून रोजी दुपारच्या सुमारास शहरातील एका परिससरात घडली. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती एका केक शॉपमध्ये काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करते. गेल्या काही वर्षांपासून ती तरुणी संशयित प्रसाद उर्फ प्रेम कमलाकर पाटील याला ओळखत असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तरुणीने तरुणासोबत असलेले प्रेमसंबंध तोडले आहे. दरम्यान, दि. २ जून रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास तरुणी घरी असतांना तिच्या मोबाईलवर प्रसाद उर्फ प्रेम पाटील याने फोन केला. मात्र तरुणीने फोन न उचलल्याने थोड्यावेळानंतर संशयित प्रसाद हा तरुणीच्या घरी आला.

    तू माझा फोन का उचलत नाहीस असे म्हणत संशयित प्रसाद पाटील याने तरुणीला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू मला नाही सांगितले तर मी तुला मारुन टाकेल असे म्हणत त्याने हातातील चावीने तरुणीच्या पाठीवर वार केले. थोड्यावेळानंतर तरुणीची आई घरी आली असता, संशतिय प्रसाद याने तरुणीसह तिच्या आईला शिवीगाळ केली. ही कोणासोबत बोलते हे जर नाही सांगीतले तर मी तुमच्या घरात फाशी घेवून टाकेल आणि तुमच्या मुलीला सुद्ध मारुन टाकेल अशी धमकी देत तो निघून गेला.

    मारहाण केल्यामुळे तरुणीच्या छाती, पोटात आणि पाठीत दुखत असल्यामुळे तीला तिच्या आईने तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तरुणीने दिलेल्या जबाबावरुन संशयित प्रसाद उर्फ प्रेम कमलाकर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लघुशंकेच्या वादातून तरुणाची हत्या; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

    June 4, 2026

    मैत्रिणीने लावले व्यसनाचे आमिष; तरुणीवर अत्याचार, ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

    June 4, 2026

    रामानंदनगरात अल्पवयीन चालकाची बेफाम कार; आठ जणांना उडवले

    June 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.