Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मैत्रिणीने लावले व्यसनाचे आमिष; तरुणीवर अत्याचार, ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा
    क्राईम

    मैत्रिणीने लावले व्यसनाचे आमिष; तरुणीवर अत्याचार, ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

    editor deskBy editor deskJune 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढण्यास मदत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने तरुणीला दारू पाजून तिच्यावर कारमध्ये शारीरिक अत्याचार केले आणि तिचे नग्न फोटो काढून तिला ब्लॅकमेल करीत वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

    या गंभीर प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात निर्मल दिनेश तिवारी (रा. प्रजापती नगर), जय चौधरी (शिव कॉलनी) आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ सह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत तरुणी आणि तिची मैत्रीण या दोघी जळगावच्या एका शाळेत एकत्र शिक्षण घेत होत्या. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिची मैत्रीण पिडीतेच्या घरी जेवायला आली असता तिने दुसऱ्या दिवशी पिडीतेला पहिल्यांदा सिगारेट दिली. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पिडीतेचे आई-वडील गावाला गेले असताना, मैत्रीणीने पिडीतेला निर्मल दिनेश तिवारी याच्यासोबत कारमधून नेले आणि तिथे त्यांनी सिगारेट, दारू व गांजाचे सेवन केले. मैत्रीणीने पिडीतेला या व्यसनाच्या आहारी लावले असे फिर्यादीत नमूद आहे.

    ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपी निर्मल तिवारी याने पिडीतेला मोहाडी रोडवरील ट्रॅकवर नेऊन दारू पाजली आणि कारमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्याने पिडीतेच्या नकळत तिचे नग्न फोटो काढले. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता. धक्कादायक बाब म्हणजे, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्मलने तिला धमकी देऊन घरातून पळवून नेले आणि १५ एप्रिल २०२६ पर्यंत त्याच्या घरी ठेवले.

    पिडीतेने निर्मलच्या घरी पुन्हा जाण्यास नकार दिल्यानंतर, २७ मे २०२६ रोजी निर्मलचा मित्र गौरव पुरोहित याने तिला स्नॅपचॅटवर अश्लील मेसेज करून तिचा विनयभंग केला. याशिवाय, जय चौधरी नावाच्या तरुणाने पिडीतेच्या घराच्या कंपाउंडमध्ये दोन ते तीन वेळा ड्रग्ज आणून दिल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या वडिलांसमक्ष ३ जून रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास आली. त्यानुसार संशयित आरोपी निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशन मध्ये ‘पोक्सो’ सह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फोन उचलला नाही म्हणून संताप; प्रेयसीच्या घरात घुसून तरुणाचा धिंगाणा

    June 4, 2026

    लघुशंकेच्या वादातून तरुणाची हत्या; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

    June 4, 2026

    रामानंदनगरात अल्पवयीन चालकाची बेफाम कार; आठ जणांना उडवले

    June 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.