Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !
    क्राईम

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    editor deskBy editor deskApril 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील इस्लामपुरा भागातील कसाई गल्लीत बेकायदेशीरपणे गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर शनिवारी दि. २६ रोजी शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून सुमारे ३० किलो गोमांस आणि मांस कापण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी आजम शेख सलीम शेख (वय २४) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील इस्लामपुरा भागातील मदिना मशीद जवळ एका लाकडी पार्टीशनच्या दुकानात गोमांसाची बेकायदेशीर विक्री होत आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी सपोनि मन्सुरी यांनी पोलीस पथक आणि दोन पंचांना पाचारण केले. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले.

    घटनेचे गांभीर्य ओळखून पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश अशोक चोपडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी येऊन मांसाची पाहणी केली आणि तपासणीसाठी सुमारे २०० ग्रॅम मांसाचे नमुने मिठासह हवाबंद डब्यात सील केले. हे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत. पोलीस कॉन्स्टेबल निलेश वासुदेव घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आजम शेख सलीम शेख (वय २४, रा. इस्लामपुरा, जळगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातंर्गत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी साजीद मन्सुर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक रविंद्र गायकवाड, पोहेकॉ शशिकांत पाटील, सुभाष चव्हाण, संभाज पाटील, गणेश ढाकणे, गजानन वाघ, निलेश घुगे यांच्या पथकाने केली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026

    हळदी समारंभात धक्क्यावरून रक्तरंजित थरार; कोयत्याने डोक्यावर वार, तिघे फरार

    April 27, 2026

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.