Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी
    क्राईम

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    editor deskBy editor deskApril 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    चाळीसगाव ते कन्नड घाट मार्गावर म्हसोबा मंदिराच्या पुढे रविवारी दुपारच्या सुमारास कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील पोलीस अंमलदारासह चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    चाळीसगाव शहराकडून (एमएच ०१, बीवाय ५३७१) क्रमांकाची कार कन्नड घाटाकडे जात होती. घाटातील वळणावर कट लागल्याने वाहन घसरुन अडकले. या अपघातात कारमधून प्रवास करणारे धनी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार दिनेश बारड (वय ५१), तेजश्री बारड (वय ४८), नंदिनी बारड (वय २२) व वेदांत बारड (वय १८, सर्व रा. कल्याण) हे चौघे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील, संदीप पाटील, पोहेकॉ संदीप जगताप व अमीर तडवी, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळू बाविस्कर व इतर कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

    हा अपघात चाळीसगाव पोलीस कें द्रापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    हळदी समारंभात धक्क्यावरून रक्तरंजित थरार; कोयत्याने डोक्यावर वार, तिघे फरार

    April 27, 2026

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.