जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील उजाड कुसुंबा येथील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेत अत्तरसिंग चमारसिंग पावरा (वय ७०) यांनी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे अत्तरसिंग पावरा हे वृद्ध कुटुंबियांसह वास्तव्यास होते. बुधवारी दुपारच्या सुमारास अत्तरसिंग यांनी गावातील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर अत्तरसिंग पावरा यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.



