Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी
    क्राईम

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    editor deskBy editor deskApril 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दुचाकीवरुन जात असलेल्या प्रेम गोपाल धनगर (वय १९, रा. बोरणार, ता. जळगाव) या तरुणाला अडवित जून्या वादातून त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बोरणार गावाजवळ घडली. यापक्ररणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेला गावातील अवैध धंद्याची किनार असून त्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील बोरणार येथील प्रेम धनगर हा तरुण दि. १७ रोजी रात्री दुचाकीने म्हसावद येथून घरी जात होता. गावापासून एक कि मी अंतरावर असलेल्या हॉटेल स्वराज्यजवळ संशयित राकेश पाटील व गजा कोळी यांनी त्याला अडविले. त्याला दुचाकीवरुन खाली उतरवून जून्या वादातून पुन्हा वाद घातला. या वादात राकेश पाटील याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने प्रेम धनगर याच्या कमरेच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघे हल्लेखोर संशयित तेथून पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बोरणार गावालगत असलेल्या हॉटेलसह शेतांमध्ये अवैध पत्त्यांचे क्लब सुरु आहे. याठिकाणी झालेल्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची चर्चा गावात सुरु होती. तसेच पुर्वी अवैध धंदे चालक हे पोलिसांना छुप्या पद्धतीने पार्टी देत होते. परंतू आता पोलिस देखील बिनधास्त अवैध धंदे चालकांच्या पार्टीमध्ये हजेरी लावत असल्याने अवैध धंदे चालकांना पोलिसांचा धाक देखील उरलेला नसल्याचे त्यातून दिसून येत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026

    शुल्लक कारणाने पती-पत्नीस मारहाण ; पोलिसात गुन्हा दाखल !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.