Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskApril 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी

    येथील भोईवाडा परिसरातील रहिवासी रितेश रवींद्र सोनवणे (३०) यांचा अक्षय तृतीयेच्या दिवशी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. लग्नास अवघे आठ दिवस शिल्लक असताना घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  रितेश यांचा विवाह दि. २८ एप्रिल रोजी देवधाबा (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथील पांडुरंग बोरसे यांच्या मुलीसोबत निश्चित झाला होता. घरात लग्नाची तयारी, खरेदी व आनंदाचे वातावरण सुरू असतानाच ही घटना घडली. अक्षय तृतीयेच्या पूजनाची तयारी सुरू असताना अचानक रितेश यांना झटका आल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली. दोन दिवसांपूर्वीच मित्रपरिवाराने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. या घटनेमुळे वरणगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी सण बाजूला ठेवून कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    शुल्लक कारणाने पती-पत्नीस मारहाण ; पोलिसात गुन्हा दाखल !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.