Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चांदी पॉलीशच्या बहाण्याने फसवणूक; सतर्क तरुणामुळे तिघे भामटे जाळ्यात
    क्राईम

    चांदी पॉलीशच्या बहाण्याने फसवणूक; सतर्क तरुणामुळे तिघे भामटे जाळ्यात

    editor deskBy editor deskApril 11, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनोने गावात चांदीचे दागिने पॉलीश करून देण्याचे बहाण्याने एका महिलेची फसवणूक करून पोबारा झालेले परराज्यातील तिघं भामटे शेवगेपिंप्री येथे दिनेश रमेश राठोड या तरुणाच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडलेत.

    एका दुचाकीवर तिघं अनोळखी व्यक्ती ९ एप्रिलला सकाळच्या सुमारास जुनोने येथील कविता ताराचंद राठोड यांच्या घराजवळ आले. आम्ही सोनार असून तुमच्या चांदीचे बाजूबंद (एल्या) पॉलीश करून देतो, तुम्ही आमच्या बहिणी सारख्या आहेत, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी दोघं हातातील चारशे ग्रॅम वजनाचे चांदीचे बाजूबंद काढून त्यांच्याकडे दिले. त्यांनी ते बकेटमध्ये टाकून त्यात काही केमिकल टाकले आणि स्वच्छ करून महिलेच्या ताब्यात दिले. त्यानंतर ते तेथून निघून गेले. दरम्यान महिलेला वजनाबाबत शंका आल्याने त्या देऊळगाव गुजरी येथे सोनाराकडे गेल्यात. दागिन्यांचे वजन केले असता त्यात ६० ग्रॅमची तफावत आढळली. तर आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली तोपर्यंत तिघं भामटे शेवगेपिंप्री येथे पोहोचले. तेथेही आम्ही सोनार आहोत, सोने चांदीचे दागिने पॉलीश करून देतो, अशी बतावणी करत होते. त्याचवेळी पो.पा. रमेश छगन राठोड यांचा मुलगा दिनेश याला त्यांच्यावर शंका आली. त्याने लागलीच फत्तेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव यांच्याशी संपर्क साधला.

    तर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता हे.कॉ. गनी तडवी, पो.ना. मुकेश पाटील, चालक पो.कॉ. दिलीप पाटील यांना शेवगेपिंप्री येथे पाठवून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ते बिहारमधील रोहितकुमार मदन सहा, रोशनकुमार बबलू सहा, बलरामकुमार सिकंदर सहा (तिघे रा. पचगचिया, अभियाबाजार जि. भागलपूर) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी कविता राठोड यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल झाला असून दुचाकी जप्त केली आहे. तपास हे. कॉ. प्रवीण चौधरी करत आहे. दरम्यान, दागिने पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने गावात कुणी अनोळखी व्यक्ती फिरत असेल तर त्यापासून सतर्क राहावे. तर लागलीच फत्तेपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन स.पो.नि. अंकुश जाधव यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून संपविले आयुष्य !

    August 23, 2026

    २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

    August 23, 2026

    जळगावात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक : एक पोलिसांच्या ताब्यात !

    August 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.