Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काटेरी झुडुपात फेकले जिवंत अर्भक; कोन्हाळ्यात अमानुषतेचा कळस, परिसर हादरला!
    क्राईम

    काटेरी झुडुपात फेकले जिवंत अर्भक; कोन्हाळ्यात अमानुषतेचा कळस, परिसर हादरला!

    editor deskBy editor deskApril 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    कोन्हाळा गावात काटेरी झुडुपात जिवंत अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अर्भकाला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    कोऱ्हाळा येथे एका शेताच्या बांधालगत असलेल्या काटेरी झुडुपात एक दिवसाचे अर्भक फेकून दिल्याची माहिती पोलिस पाटील यांनी कुन्हा दूरक्षेत्र पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस हवालदार अशोक जाधव, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव व श्रावण भिल्ल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेऊन प्रथम कुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात, पुढे जळगाव येथील शासकीय रुग्णालयात टलविण्यात आले.

    घटनास्थळी पोहोचल्यावर काटेरी झुडुपात अडकलेले, अपूर्ण वाढ झालेले स्त्री जातीचे अर्भक अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. अंगावर सर्वत्र काटे रुतलेले होते, तसेच शरीरावर जखमा आणि ओरखडे दिसून येत होते. अर्भकाच्या तोंडातून रडण्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता. हे दृश्य पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.

    अर्भक अंदाजे सात महिन्यांचे असल्याचा प्राथमिक अंदाज असून, गर्भपात करून जिवंत अवस्थेत टाकून दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्भकाच्या ओठांवर जखमा असून डोक्यावर त्रिकोणी स्वरूपाची जखम आढळल्याने जादूटोण्याचा संशय ही व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.