Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रस्त्यावर विवाहितेला अडवून अश्लील मागणी; पतीला मारहाण
    क्राईम

    रस्त्यावर विवाहितेला अडवून अश्लील मागणी; पतीला मारहाण

    editor deskBy editor deskMarch 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबासह गावात वास्तव्यास आहे. दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास ती आपल्या जेठानीसोबत शौचालयाकडे जात असताना ही घटना घडली. त्यावेळी दोन संशयित आरोपींनी दुचाकी आडवी लावून महिलेला अडवले.  यानंतर आरोपींनी महिलेकडे अश्लील मागणी करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याच वेळी महिलेच्या पतीने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच “तुमच्याने जे होईल ते करून घ्या” अशी धमकीही दिली.

    घटनेनंतर पीडित कुटुंबाने तात्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नागरे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोल्ड लोन’च्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक

    June 15, 2026

    देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

    June 15, 2026

    घरकामाच्या बहाण्याने डल्ला; मोलकरणीच्या चोरीने लेक साईट रेसिडेन्सी हादरली

    June 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.