Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुक्ताईनगरजवळ मध्यरात्री दुर्घटना; चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस-ट्रकची जोरदार टक्कर
    क्राईम

    मुक्ताईनगरजवळ मध्यरात्री दुर्घटना; चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस-ट्रकची जोरदार टक्कर

    editor deskBy editor deskMarch 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    सुरतहून अमरावतीकडे जाणाऱ्या खासगी बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने २९ प्रवासी जखमी झाले. यातील १२ जण गंभीर आहेत. ही घटना मुक्ताईनगर-मलकापूर महामार्गावर गुरुवारी रात्री १:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  ट्रकचालक राजेंद्र विनायक सैंदाणे (५६, रा. बोदर्डे, ता. पारोळा) यांच्या तक्रारीवरून साई दर्शन ट्रॅव्हल्सचे चालक अक्षय संतोष पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, सैंदाणे हे ट्रक (एमएच-१८ बीझेड-७०३९) घेऊन नरडाणा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे जात होते. मुक्ताईनगरजवळील पेट्रोल पंपासमोर ते थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या ट्रकला मागून येणाऱ्या लक्झरी बसने (क्र. एमपी-४४ झेडबी-०७७७) या जबर धडक दिली. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या धडकेत ट्रक व खासगी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून २९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी १२ जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    जखमींमध्ये अक्षय संतोष पाटील (धुळे), योगेश पुंडलिक गरडे (दुधगाव), शेख इमरान शेख अशपाक (अकोला), परमेश्वर अंबादास बळकाट (नांदेड), दुर्गेश बापू पाचांदे (धुळे), शिवम विकास पुरी (आर्वी), गजानन त्र्यंबक कळसकर (खैरी दर्यापूर), माधुरी दिवाकर नंदगीरवाल (गडचिरोली), शिवा बंडू खराटे (यवतमाळ), संगीता गजानन कळसकर (सुरत), आशा मल्हारी भोंगळे (अकोला), तोताराम साबा परमारीक (राजस्थान) यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘धनंजय मुंडे दुसरे खरातच’; करुणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

    April 15, 2026

    चाकणकर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; अदिती तटकरे यांच्यावर थेट सवालांचा भडिमार !

    April 15, 2026

    कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.