Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साकरे शिवारात विजेचा कहर : कडकडाटासह वीज कोसळली; १५ शेळ्या जागीच ठार !
    क्राईम

    साकरे शिवारात विजेचा कहर : कडकडाटासह वीज कोसळली; १५ शेळ्या जागीच ठार !

    editor deskBy editor deskSeptember 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    साकरे शिवारात २३ रोजी सायंकाळी चार वाजता विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरु झाला. दरम्यान, वीज कोसळून जवळपास १५ शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. परंतु, सर्व मजूर बचावले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार,  साकरे शिवारात वीज कोसळून १५ शेळ्या ठार झाल्या आहेत. आबा पाटील, गोकुळ पाटील, नारायण पारधी, भगवान पारधी, जामलाल पारधी या मजुरांच्या या शेळ्या होत्या. परंतु, सुदैवाने सर्व मजूर थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धरणगावचे पशुवैद्यकीय अधिकारी गौरव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी शेळ्यांचा पंचनामा केला. या वेळी तलाठी संदेश महाजन, पोलिस पाटील घनश्याम पाटील, कोतवाल शीतलकुमार पवार, किशोर पाटील व शिवसेनेचे मीडिया प्रमुख गजानन महाजन हजर होते.

    तर हे वृत्त कळताच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ तसेच तालुका प्रमुख जयदीप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी या घटनेचीम माहिती धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्ववंशी यांना दिली. तसेच मयत शेळ्यांचा पंचनामा करुन पीडित मजूरांना नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गिरणा धरणात १०० टक्के पाणीसाठा, मग शेतकऱ्यांना एकच आवर्तन का? आमदार किशोर पाटील आक्रमक!

    November 23, 2026

    ‘कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यालाही वेळेवर पाणी मिळाले पाहिजे!’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

    November 23, 2026

    शेतीच्या व्यवहारातून रक्तरंजित वाद; डॉक्टरांचा खून करून मृतदेह बहुळा धरणात फेकल्याची कबुली!

    November 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.