जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२६ ही केवळ मतदानापुरती मर्यादित न राहता, शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणारी एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक संधी ठरणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (क) मधून समाजकारणाला प्राधान्य देणारे, सेवाभावी वृत्तीचे आणि जनतेशी थेट नातं जपणारे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे.
डॉ. चंद्रशेखर पाटील हे राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आरोग्य, स्वच्छता, सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कामामुळे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला असून, याच विश्वासाच्या बळावर ते आज निवडणूक लढवत आहेत.
प्रभागातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांसाठी विकासात्मक उपक्रम राबवण्याचा त्यांचा ठाम संकल्प आहे. “समस्या ऐकून घेणारे आणि त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेले प्रतिनिधित्व” हीच आपली ओळख असल्याचे डॉ. पाटील सांगतात.
प्रचारादरम्यान घराघरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांचा वाढता सहभाग आणि विकासाबाबत व्यक्त होणारा विश्वास पाहता परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. “निवडणूक ही पदासाठी नाही तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. नागरिकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,” असा विश्वास डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
एकूणच, प्रभाग क्र. ९ (क) मध्ये राजकारणापेक्षा समाजकारण आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे पाहिले जात असून, ही निवडणूक त्यांच्या कामाच्या पावतीवरच लढवली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.



