Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एसीबीच्या सापळ्यात अडकला जिल्हा परिषदेतील अधिकारी !
    क्राईम

    एसीबीच्या सापळ्यात अडकला जिल्हा परिषदेतील अधिकारी !

    editor deskBy editor deskApril 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्हा नेहमीच विविध कारणाने चर्चेत येत असतांना आता जळगाव जिल्हा परिषदेत बड्या अधिकाऱ्याच्या नावाने लाच घेणाऱ्या अधिकारीला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यास १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने तक्रारीवरून सापळा लावला आणि दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास लाच घेतांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य विभागातील काहींची चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. अति. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार जळगाव एसीबीने लाच मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर आरोग्य विभागात सापळा लावला. त्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयंवत मोरे यांना तडजोडी अंती १५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या कारवाईमुळे सायंकाळी आरोग्य विभागात शुकशुकाट दिसून आला.

    दरम्यान या कारवाई नंतर आरोग्य विभागातील काही अधिकारी, अधिनिस्त कर्मचारी यांची चौकशी केली असून त्यांच्याकडून जळगाव एसीबीचे पथक माहिती घेत आहे. तर एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पुढील कारवाई करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.