Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात पोलिसांचा दणका : घरफोडीतील सोनं-चांदी आणि रोकड महिलेला परत !
    क्राईम

    जळगावात पोलिसांचा दणका : घरफोडीतील सोनं-चांदी आणि रोकड महिलेला परत !

    editor deskBy editor deskOctober 11, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील महाजन नगर, रामेश्वर कॉलनी येथे कुलुपबंद घराचा कडीकोयंडा तोडत चोरट्यांनी घरातील सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड असा मुद्देमाल चोरुन नेला होता. या गुन्ह्यात तपासात उल्लेखनीय कामगिरी करत हस्तगत केलेला ३२ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचा सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम कायदेशीर पूर्तता करुन मूळ फिर्यादी महिलेस परत केले.

    न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ मूळ फिर्यादी अथवा मालकांना परत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याने तत्परतेने कार्यवाही केली.

    रामेश्वर कॉलनी परिसरातील महाजन नगर येथील रहिवासी संगिता राजू घुगे यांच्या बंद घरात प्रवेश करत चोरट्यांनी हा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासात संशयित आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर, गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल परत मिळावा, यासाठी फिर्यादी यांनी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने गुरुवारी मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिले. एम. आय. डी.सी. पोलीस ठाण्यात पंचांसमक्ष अधिकृत पंचनामा करून घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला एकूण ३२ लाख १८ हजार ८०० रुपये मुद्देमाल मूळ फिर्यादी संगिता राजू घुगे यांना शनिवारी सुपूर्द करण्यात आला.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकांतील अधिकारी, अंमलदार यांचे पथकाने ही उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्ते कामातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : १२ वर्षीय बालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार-अभियंत्यावर कारवाई

    October 11, 2026

    घरातून बेपत्ता, विहिरीत मृतावस्थेत आढळले : नशिराबादच्या घटनेने खळबळ !

    October 10, 2026

    महाराष्ट्र ग्रामीण बँकेबाहेर चोरट्यांचा डाव : दुचाकीच्या डिक्कीतून २.१५ लाखांची पिशवी लंपास !

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.