जळगाव : [प्रतिनिधी
एका लग्न सोहळ्यात भेट झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवत शेख शाहीद फारुख (रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) याने धुळे येथील २३ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार सन २०२४ पासून सुरू होता. याप्रकरणी शेख शाहीद याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दोन मुलांची आई असलेल्या धुळे येथील महिलेची शेख शाहीद याच्याशी एका लग्न सोहळ्यात ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरले. त्यावेळी तीन मुलांचा पिता असलेल्या शेख शाहीद याने महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर जळगाव व धुळे येथे वेळोवेळी अत्याचार केला. दोन वर्षांहून अधिक काळ उलटला तरी हा तरुण लग्न करीत नसल्याने महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शेख शाहीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत. अत्याचार करणारा शेख शाहीद हा चालक म्हणून काम करतो. सध्या तो वाहन घेऊन अन्य राज्यात गेलेला आहे.



