जळगाव : प्रतिनिधी
लग्नात झालेल्या वादाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन एकमेकांवर तलवार, लोखंडी – पाईप, आसारीने वार करण्यात आले. ही घटना दि. ६ जून रोजी नशिराबाद येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथील सैयद वसीम सैयद बिसमिल्ला (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा लहान भाऊ लग्नाच्या पंगतीत झाडत असताना त्याने एका जणाला बाजूला होण्यास सांगितले. त्यावरून त्यांना मारहाण करीत तलवार व आसारीने वार केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातील मोहंमद रफीक अब्दुल हक (वय ४६, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लग्नात – झालेल्या वादाच्या कारणावरून चार जणांनी त्यांना शिवीगाळ करीत लोखंडी पाईपाने मारहाण केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



