• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकनाथ शिंदे – जनतेचा नेता, विकासाचा ध्यास ! – मंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

editor desk by editor desk
February 9, 2025
in जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
एकनाथ शिंदे – जनतेचा नेता, विकासाचा ध्यास ! – मंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

मुंबई/जळगाव, : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाणीपुवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांचा भव्य सत्कार केला. या सोहळ्यात कार्यकर्त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

“संघर्षातून उभा राहिलेला खरा जननेता !”

यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कणखर आणि निर्णयक्षम नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. “एकनाथ शिंदे हे केवळ राजकीय नेते नसून ते सामान्य जनतेचे आधारस्तंभ आहेत. नेतृत्व, जिद्द आणि धैर्याचे प्रतीक म्हणजेच एकनाथजी शिंदे. संघर्षातून नेतृत्व करणारा, बाळासाहेबांची खरी शिवसेना जपणारा, गरिबांचा वाली आणि कार्यकर्त्यांच्या आधारावर उभा असणारा नेता म्हणजेच बाळासाहेबांचा वाघ आणि आनंद दिघे साहेबांचा शेर – एकनाथ शिंदे आहेत. असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शिवसैनिकांचा व लाडक्या बहिणींचा खरा आधारवड

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे हे राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. त्यांनी केवळ आश्वासन दिली नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे तमाम जनतेचा विश्वास त्यांच्या नेतृत्वावर आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मराठी स्वाभिमान, हिंदुत्व आणि विकासाचा विचार शिंदे साहेब पुढे नेत आहेत. त्यांनी शिवसैनिकांचा सन्मान आणि जनतेच्या हितासाठी मोठमोठे निर्णय घेतले आहेत. खऱ्या अर्थाने, शिवसैनिकांचा व लाडक्या बहिणींचा आधारवड म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत.

शेरो-शायरीतून दिल्या प्रेरणादायी शुभेच्छा

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत एकनाथ शिंदे यांना शेरो-शायरीच्या माध्यमातून दमदार शुभेच्छा दिल्या –

“जो वादों पे नही, इरादों पे चलते हैं,
ऐसे नेता कभी हराये नही जाते हैं !

महाराष्ट्र में बुलंदी से नाम गूंजे,
वही एकनाथ शिंदे, जो दिलों में बस जाते हैं !

याप्रसंगी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे यांच्यासह विविध मान्यवर आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Previous Post

संतापजनक : महिलेचा खून करून मृतदेहासोबत केला अत्याचार !

Next Post

आर्थिक बाबींबाबत मतभेद होऊ शकतात.

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

आर्थिक बाबींबाबत मतभेद होऊ शकतात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group