Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात शिवशक्ती वाहतूक सेनेची तालुका कार्यकारिणी जाहीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र
    जळगाव

    धरणगावात शिवशक्ती वाहतूक सेनेची तालुका कार्यकारिणी जाहीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र

    editor deskBy editor deskSeptember 29, 2026Updated:September 29, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेच्या धरणगाव तालुका कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशफाक शाह यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    धरणगाव तालुक्यात शिवशक्ती वाहतूक सेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली. वाहतूक क्षेत्रातील कामगार, चालक, मालवाहतूकदार तसेच संबंधित घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

    यावेळी समाधान माळी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, सुनील राजेंद्र बिरले माळी यांची तालुका अध्यक्षपदी, दर्शन श्रीराम भोई यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच मनोज शांताराम महाजन यांची धरणगाव शहराध्यक्षपदी, हेमंत भगवान कोळी यांची संघटकपदी, पिंटू जानकीराम बडगुजर यांची शहर उपाध्यक्षपदी आणि लहू विठ्ठल महाजन यांची शहर चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

    नियुक्तीपत्र वितरणाच्या कार्यक्रमाला शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशफाक शाह, जिल्हा उपाध्यक्ष समाधान माळी, तालुका अध्यक्ष सुनील राजेंद्र बिरले माळी, तालुका उपाध्यक्ष दर्शन श्रीराम भोई, शहराध्यक्ष मनोज शांताराम महाजन, संघटक हेमंत भगवान कोळी, शहर उपाध्यक्ष पिंटू जानकीराम बडगुजर, शहर चिटणीस लहू विठ्ठल महाजन यांच्यासह जब्बार भाई शेख, इरफान शेख, पवन महाजन, नवलसिंग पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडून संबंधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्टिफिकेटपेक्षा कौशल्याचा प्रत्यक्ष वापर महत्त्वाचा : श्रीकांत धिवरे

    September 29, 2026

    पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर शिक्षिकेचाही मृत्यू; तीन महिन्यांत कुटुंबावर काळाचा घाला

    September 29, 2026

    जळगावात ३५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

    September 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.