नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या उपराजधानीमध्ये गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असतांना आता एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका विकृत तरूणाने विवाहित महिलेचा खून करून मृतदेहासोबत बलात्कार केल्याची संतापजनक घडली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक घटनेने नागपूरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. शरीरसंबंधास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात तरूणाने महिलाचा खून केला, त्यानंतर मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवल्याचं तपासात उघड झालेय.
नागपूरमधी हुडकेश्वरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समजतेय. पोलिसांनी आरोपी रोहितला बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोहित आणि मृत महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. महिलेने आरोपीला शरीरसंबंधास नकार दिला, त्यामुळे रागाच्या भरात त्याने आधी गळा दाबून महिलेचा खून केला. कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेच्या अंगावर कपडे घालून आरोपी पसार झाला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. हुडकेश्वर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही मूळची मध्यप्रदेशची आहे. कामाच्या शोधात ६ वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली होती. महिलेचा पती ढाब्यावर आचारी म्हणून काम करतो, तर मुलगी सातवीला आहे. आचारी पती सकाळी कामावर गेल्यानंतर मध्यरात्री एक वाजताच घरी येतो. मृत महिलेला दारूचे व्यसन होते, त्यामुळे येथील दोन-चार दारूड्या मुलासोबत तिची ओळख झाली होती. रोहित अन् मृत महिलेची ओळख झाली, त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले.
दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ते वारंवार भेटायचे. नवरा कामावर गेल्यानंतर आणि मुलगी शाळेत गेल्यावर रोहित मृत महिलेला तिच्या घरी भेटायचा. गुरूवारीही पती कामावर गेल्यानंतर महिलेने रोहितला फोन करून घरी दारू घेऊन बोलवले. दोघांनी दारु ढोसली आणि जेवण केले. नशेत असणाऱ्या रोहितने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पण त्या महिलेने नकार दिला. संतापलेल्या रोहितने गळा दाबून तिचा खून केला. दारूच्या नशेत त्याने मृतदेहासोबत बलात्कार केला अन् पळ काढला.