Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अवैध २७ सिलिंडर जप्त तर दोघांना अटक
    क्राईम

    अवैध २७ सिलिंडर जप्त तर दोघांना अटक

    editor deskBy editor deskFebruary 9, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    घरगुती गॅस काळा बाजार व त्यासाठी लागणारे साहित्य व साधनासह विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २७सिलिंडरसह जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली.

    सविस्तर वृत्त असे कि, शेख नौशाद शेख नजीर (३१, रा. नसरवंजी फाईल, भुसावळ) आणि रिक्षाचालक निलेश सुरेश चौधरी, (रा. पंढरीनाथ नगर, भुसावळ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन जणांची नावे आहेत. शहरातील नसरंवजी फाईल, शिवाजीनगर भागात हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

    ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक शरद बागुल, पोहेकॉ. कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ, भारत पाटील यांनी केली.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी जाऊन खात्री करून छापा टाकला. त्यात शेख नौशाद याच्या मालकीच्या टपरीमध्ये घरगुती गॅस काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी लागणारे २७ गॅस सिलिंडर, १ ऑटो रिक्षा तसेच गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य असे एकूण १,५७,०००/-रु.कि. चा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत ऑटोरिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणारा रिक्षाचालक निलेश चौधरी यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. ला अत्यावश्यक वस्तू कायदा ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात सहा ते सात ठिकाणी अवैधरित्या वाहनात गॅस भरणा करण्यात येतो त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : प्रेम प्रकरणातून गोळीबार : प्रेयसीची हत्या करत प्रियकराने संपविले आयुष्य !

    February 28, 2026

    जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक

    February 28, 2026

    आंध्र प्रदेशात फटाक्यांचा भीषण स्फोट; १८ ठार !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.