नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार शिकोगोजवळील गॅस स्टेशनजवळ घडला. साई तेजा नुकारापू (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील आहे.
बीआरएसचे आमदार मधुसुदन थाथा यांनी अमेरिकेतून मिळालेल्या प्राथमिक माहितीचा हवाल देत सांगितले की, साई तेजा नुकारापू याने बीबीए पदवी घेतली आहे. तो अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेत होता. तसेच तो अर्धवेळ एका गॅस स्टेशनवर नोकरी करत होता. शनिवारी पहाटे तो ड्युटीवर नव्हता परंतु स्टेशनवरील मित्राला मदत करत होता. मित्र काही कामानिमित्त गॅस स्टेशनमधून बाहेर गेाहोता. तेव्हा गॅस स्टेशनवर आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात साई तेज याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली.