• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लाडक्या भाचींचा हट्ट पुरविताना राजूमामांची दमछाक, प्रचारात घेतला वेग

दांडेकर नगर, शिवराणा नगरात नागरिकांकडून जल्लोषात स्वागत

editor desk by editor desk
November 14, 2024
in जळगाव, राज्य
0
लाडक्या भाचींचा हट्ट पुरविताना राजूमामांची दमछाक, प्रचारात घेतला वेग

जळगाव (प्रतिनिधी) : ठिकठिकाणी, घरोघरी हट्टाने आपल्या घरी बोलावून घेत भाचींनी आपल्या लाडक्या राजुमामा भोळे यांना बोलावून औंक्षण करीत फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला. प्रत्येक भाचीच्या ओवाळण्याचा हट्ट पुरविताना आ. राजूमामां भोळे यांना दमछाक झाले. आता प्रचाराला केवळ ५ दिवस उरले असताना आ. भोळे यांनी प्रचारात प्रचंड वेग घेतला आहे.

आ. राजूमामा भोळे यांनी पिंप्राळा येथील भवानी माता मंदिर येथे पूजा अर्चा करून प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आ. भोळे यांनी दांडेकर नगर परिसर, पिंप्राळा बाजार रोड परिसर, शिवराणा नगर, शंकर अप्पा नगर, शिंदे नगर परिसर, जिल्हा बँक कॉलनी परिसर, इंद्रनील सोसायटी मार्गे स्वामी समर्थ मंदिर जवळ समारोप करण्यात आला. अनेक ठिकाणी महिला भगिनी, भाचींनी आ. राजूमामा भोळे यांना ओवाळण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येक भाचीने घरी नेत आ. राजूमामांना ओवाळून भरभरून आशीर्वाद घेतले.

प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी आ. राजूमामा भोळे यांच्याशी नागरिकांनी विविध विषयांवर चर्चा करून संवाद साधला. रॅलीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख संगीता गवळी यांनी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जय श्री दादाजी फाउंडेशनतर्फे आ. भोळे यांचा पुष्पगुच्छ, भगवी शाल देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.

रॅलीत भाजप महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताईं बेंडाळे, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. पी. एस. पाटील, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे मंडळ क्र. ५ चे अध्यक्ष शक्ती महाजन, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला मोर्चा सरचिटणीस सविता बोरसे, माजी नगरसेवक विजय पाटील, शोभाताई बारी, सुरेश सोनवणे, प्रतिभा देशमुख, डॉ. चंद्रशेखर पाटील, अतुल बारी, योगेश गोसावी, संजय तायडे, जिभाऊ वानखेडे, राहुल पाटील, निलेश पाटील, मंगलसिंग पाटील, राजू केळकर, शिवसेनेचे कुंदन काळे, हर्षल मावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मीनल पाटील, लोक जनशक्ती पक्षाचे आनंदा सोनवणे, मनोज निकम, श्रावण मोरे, आरपीआय आठवले गटाचे मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप

Next Post

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

Next Post
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

जळगावात चारचाकीचा थरार : अनेक वाहनासह महिलेला दिली जबर धडक !

June 20, 2025
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

जळगावात शालकाने केली मेहुण्याची तब्बल तीन कोटींत फसवणूक !

June 20, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

भुसावळात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 20, 2025
खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group