Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खान्देश मिल कॉम्प्लेक्समध्ये हल्लेखोरांचा हैदोस; आनंद मेळ्याच्या आयोजकावर धारदार शस्त्राने वार!
    क्राईम

    खान्देश मिल कॉम्प्लेक्समध्ये हल्लेखोरांचा हैदोस; आनंद मेळ्याच्या आयोजकावर धारदार शस्त्राने वार!

    editor deskBy editor deskNovember 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    खान्देश मिल कॉम्लेक्स येथील आनंद मेळ्यात पैशांची मागणी करत तीन जणांनी आयोजकासह दोघांना बेदम मारहाण केली. एकावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, खिशातील १५०० रुपयांची रोकड लांबवली. ही घटना १२ रोजी रात्री घडली.

    अरबाज शकील शेख (२६, रा. उस्मानिया पार्क, जळगाव) यांनी खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरात आनंद मेळा आयोजित केला आहे. गुरुवारी रात्री तीन संशयित तरुण अचानक मेळ्याच्या ठिकाणी आले. त्यांनी शेख यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली आणि मेळा भरवल्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली. शेख यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना बेदम मारहाण केली. हल्लेखोरांपैकी एकाने धारदार शस्त्राने अरबाज शेख यांच्यावर वार केले. तसेच खिशातील १५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली, विशेष म्हणजे, याचवेळी मेळा पाहण्यासाठी आलेले मोहम्मद अनस खान खलील खान (रा. शाहूनगर) हे मध्यस्थी करण्यासाठी किंवा प्रकार पाहण्यासाठी आले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. अरबाज शकील शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एका हल्लेखोराला घटनास्थळावर ताब्यात घेतले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन त्याचे इतर दोन साथीदार तेथून पळून गेला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव-भोलाणे रस्त्यावर भीषण घटना; शेतात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह!

    November 14, 2026

    ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवासाठी मनपा सज्ज : मिरवणूक मार्ग स्वच्छतेचे उपमहापौरांचे कडक निर्देश!

    November 13, 2026

    जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम : ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्याकडून जैन उद्योग समूहाच्या उपक्रमाचे कौतुक

    November 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.