• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

…म्हणून रोहिणी खडसेंना निवडून द्या – शरद पवार

editor desk by editor desk
November 12, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
…म्हणून रोहिणी खडसेंना निवडून द्या – शरद पवार

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषी मंत्री खा .शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा मुक्ताईनगर येथे संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ शिरीष दादा चौधरी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख परब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरुण पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटिल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार , डॉ जगदीश पाटील, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगरच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे, भुसावळचे उमेदवार डॉ राजेश मानवतकर, रावेरचे उमेदवार ॲड . धनंजय चौधरी,आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते उपस्थित होते.

यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, ॲड. रोहिणी खडसे या गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात आहेत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगुन ॲड.रोहिणी खडसे, डॉ.राजेश मानवतकर, ॲड. धनंजय चौधरी यांना विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले

यावेळी मार्गदर्शन करताना आ. एकनाथराव खडसे यांनी महायुतीच्या काळात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले, महागाई वाढली, तरुणांना रोजगार देणारे उद्योग इतर राज्यात पळवले गेले शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही हे चित्र बदलण्यासाठी महविकास आघाडीचे सरकार आणण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले मुक्ताईनगर मतदारसंघ विकासात मागे पडला असून, मतदारसंघांत गुंडगिरी वाढली असून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे सर्व थांबवण्यासाठी उच्चशिक्षित असलेल्या ॲड. रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी रोहिणी खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मागच्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला तरी गेले पाच वर्ष सतत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत राहिले प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला जनतेच्या, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा प्रश्नांसाठी आंदोलने केली निवेदने दिली, जनसंवाद यात्रा काढून जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या त्या सोडविण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सर्वांची साथ लाभली ती कायम ठेवून आपल्याला मतदान करण्याचे रोहिणी खडसे यांनी जनतेला आवाहन केले.

निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याला आपले पहिले प्राधान्य असेल उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेऊन शेतीला पाणी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, पर्यटन विकास करून व उद्योग धंदे आणून तरुणांना रोजगार देण्याचा आपला प्रयत्न राहिल त्यासाठी निवडून देण्याचे रोहिणी खडसे यांनी मतदारांना आवाहन केले
यावेळी मार्गदर्शन करताना शरदचंद्र पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे ४०० खासदार हवे तसे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे. मात्र ४०० जागा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचं यांच्या मनात पाप होतं. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यासाठी सर्व एकत्र आले. इंडिया नावाची आघाडी काढली. सर्वांना एकत्र केलं, तुम्ही साथ दीली राज्यात एकतीस खासदार निवडून आले वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.

राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पण गेल्या अडीच वर्षात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा उपयोग केला गेला नाही कशासाठी सत्तेचा उपयोग केला गेला हे आपण बघितले. शेतकरी अडचणीत आला आहे गेल्या सहा सात महिन्यात राज्यात ८५६ शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटना घडल्या या आत्महत्या कर्जबाजारीपणातून झाल्या उद्योगपतींचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांचे का केले नाही असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. शिवरायांच्या या राज्यात गेल्या काही दिवसात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली , तरुणांच्या हाताला रोजगार नाही हे चित्र बदलायचे आहे त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे असे शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली तर महालक्ष्मी योजने अंतर्गत राज्यात स्त्रियांना महिन्याला तिन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास लागु केला जाईल. शेतकऱ्यांना तिन लाखा पर्यंत कर्ज माफ केले जाईल नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. बेरोजगार तरुणांना काम मिळेपर्यंत महिन्याला चार हजार रुपये दिले जातील प्रत्येक कुटुंबाचा पंचवीस लाखा पर्यंत आरोग्य विमा काढला जाईल. हे सर्व राबवण्यासाठी मतदानातून साथ द्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे शरद पवार यांनी जनतेला आवाहन केले. विशाल महाराज खोले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची सभेला उपस्थिती होती

Previous Post

चौधरी बंधूंचा सुतगिरणीत महाघोटाळा, अमळनेरकरांच्या स्वप्नांचा केला चुराडा

Next Post

रोहिणी ताई खडसे यांच्या सेवकार्याचे बावनकशी सोने निरखेल- ईश्वर रहाणे

Next Post
रोहिणी ताई खडसे यांच्या सेवकार्याचे बावनकशी सोने निरखेल- ईश्वर रहाणे

रोहिणी ताई खडसे यांच्या सेवकार्याचे बावनकशी सोने निरखेल- ईश्वर रहाणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group