Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन अल्पवयीन मुले बेपत्ता
    क्राईम

    दोन अल्पवयीन मुले बेपत्ता

    editor deskBy editor deskOctober 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील रसलपूर येथील दोन्ही अल्पवयीन मुले पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहेत. भुसावळ रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून रेल्वेगाडीत बसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रसलपूर येथील दोन अल्पवयीन मुले आहेत. २२ रोजी पहाटे घरातील कुटुंब उठल्यानंतर मुलगा दिसला नाही. त्याच्या मित्राकडे तपास करण्यासाठी गेले असता तो नसल्याचे निर्देशनास आले. दोन्ही कुटुंबीयांनी शोधाशोध केली. यातील एकाच्या मोबाइलवर संपर्क केला असता होऊ शकला नाही. दरम्यान, भुसावळ रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता २२ रोजी रेल्वेत बसताना दिसत आहेत. याप्रकरणी रावेर पोलिसांत अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ. सतीश सानप तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बदलापूर पुन्हा हादरले : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

    January 23, 2026

    राजीव गांधी नगरात तरुणावर दगडाने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    January 23, 2026

    डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.