लाईव्ह महाराष्ट्र : जळगाव
माजी मंत्री डॉ. सतीश अण्णा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळू नये यासाठी पारोळ्यातील गद्दाराच्या मुलाकडून 10 सी आर ची ऑफर एका माडवली बादशाह कदून दिली गेली असे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार17 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावरील वाचकांना दिले गेले. अखेर विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती शिक्कामोर्तब होण्याच्या मार्गावर असून पहिल्या यादीत डॉक्टर सतीश अण्णांचे नाव कट करण्यात मांडोली बादशहा यशस्वी झाले आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावंत रवींद्र प्रल्हादराव पाटील व डॉक्टर सतीश भास्करराव पाटील हे दोन व्यक्ती आहे. डॉक्टर सतीश अण्णा म्हटलं म्हणजे पवार साहेब अशी ओळख जळगाव जिल्ह्यात आहे.
परंतु अलीकडे राजकारणातील डावपेच व गुप्त चालीमुळे रवींद्र पाटील व डॉक्टर सतीश पाटील यांना राजकीय सारीपाटावरून बाजूला सारण्याचे काम कुटील राजकारणी करण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले आहे असे म्हटले तर वागे ठरणार नाही. डॉक्टर सतीश अण्णा यांनी बाजार समिती निवडणुकीत आपल्याला धूळ चारली तीच पुनरावृत्ती येथे होईल म्हणून अण्णा नकोच हीच भूमिका गद्दाराच्या मुलाने घेतल्यामुळे मशाल पाहिजे आपल्याला तरच आपण निवडणूक जिंकू यासाठी सर्व उठाठे सुरू आहे. गद्दाराच्या मुलाचे 10 सीआरचे लाभार्थी कोण कोण आहेत हे लवकरच स्पष्ट होईल व बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभेत 65 हजाराचे मताधिक्य भाजपाला, जामनेर मध्ये पंधरा दिवशी पूर्वी आलेले कोळपे यांना उमेदवारी, मग निष्ठावंत असलेले डॉक्टर सतीश पाटलांचा काय गुन्हा होता पहिल्या यादीत नाव आले नाही. सतीश अण्णांना उमेदवारी नाकारणे म्हणजे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धोक्याचा इशारा मानला जातो कारण कोणीही निष्ठावंत राष्ट्रवादी थांबणार नाही किंवा विश्वासही ठेवणार नाही . तुतारीवर सतीश अण्णा नको नको फक्त मशाल वर कोणीही आला तरी अशी अट टाकून या 10 सी आर ची डिलीग झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.