Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील भाविक ज्योत घेवून येत असतांना ट्रॅक्टर रस्त्यावर उलटले
    क्राईम

    जळगावातील भाविक ज्योत घेवून येत असतांना ट्रॅक्टर रस्त्यावर उलटले

    editor deskBy editor deskOctober 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील हरिविठ्ठल नगरातील दुर्गोत्सव मंडळातील तरुण मनूदेवी येथून ज्योत घेवून जात होते. त्यांच्यासोबत असलेले ट्रॅक्टर डोणगाव रस्त्यावरील वळाणावरुन उलटले. यामध्ये एक तरुण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता घडल.

    मिळालेल्या माहितीनुसार, सालाबादप्रमाणे जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील काही तरुण यावल तालुक्यातील मनूदेवी येथे ज्योत घेण्यासाठी आले होते. ज्योत घेवून ते माघारी परतत असतांना भाविकांना घेवून निघालेले ट्रॅक्टर चिंचोली गावापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर उलटले. चिंचोली येथील प्रगतिशील शेतकरी दिनेश सपकाळे, डोणगाव सरपंच भैय्या पाटील, पोलीस पाटील उमेश पाटील, मनुदेवी संस्थेचे विश्वस्त नितीन पाटील, ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य राबवीत जखमींना खासगी वाहनाने उपचारासाठी रवाना केले. ट्रॅक्टर उलटल्याने वाहनात बसलेले सर्व पंधरा तरूण भाविक सुदैवाने दुर फेकले गेले. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत न झाल्याने ते बालंबाल बचावले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’

    December 8, 2025

    मध्यरात्री महिलेच्या घरात शिरून केला विनयभंग !

    December 8, 2025

    बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.