• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांच्या चाचपणीबाबत मातोश्रीवर आज बैठक !

user by user
September 24, 2024
in जळगाव, राजकारण
0

जळगाव प्रतिनिधी ।

जळगाव, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाची आज मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मुंबईत मातोश्रीवर महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील जागा निश्चित व उमेदवारांवर चर्चा होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना नेते उमेश पाटील, जिल्हाप्रमुख हर्षल माने विष्णू भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आले आहे. जळगाव ग्रामीण, जळगाव शहर, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर शिंदे गटात या आमदारांनी प्रवेश केला, यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा या जागांसाठी मोठ्या प्रमाणात आग्रह असणार आहे. चाळीसगावची जागा उमेश पाटलांसाठी शिवसेना अग्रही आहे. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघात देखील तगडा उमेदवार शिवसेनेला गवसला आहे. जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव वाघ, युवा सेना प्रमुख निलेश चौधरी, लकी अण्णा यासारखे दिग्गज उमेदवार आहेत. परंतु ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता जरी असली तरी या दिग्गज उमेदवारांसाठी शिवसेना नेते प्रतिष्ठा लावणार का याकडे लक्ष लागून आहे ?. पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी या प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे जवळपास ही जागा शिवसेनेच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे.  जळगाव शहरात शिवसेनेकडून कुलभूषण पाटील, जयश्री महाजन, विष्णू भंगाळे यासारखे प्रबळ उमेदवार आहेत. कुलभूषण पाटील यांची प्रबळ दावेदारी असल्याने बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत बैठकीनंतर जाहीर होईलच परंतु आजच्या या बैठकीकडे विशेष लक्ष लागून आहे.

Previous Post

उपक्रमशील शिक्षक संदिप पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Next Post

सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले

Next Post
सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले

सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !
चाळीसगाव

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !

May 19, 2025
हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !
क्राईम

हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !

May 19, 2025
सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !
आरोग्य

सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

May 19, 2025
शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 19, 2025
चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !
क्राईम

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

May 19, 2025
बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group