Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बापरे : आता बोकड, बकऱ्याची चोरी करण्यासाठी काढले धारदार शस्त्र !
    क्राईम

    बापरे : आता बोकड, बकऱ्याची चोरी करण्यासाठी काढले धारदार शस्त्र !

    editor deskBy editor deskSeptember 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील हिंगोणे शिवारात तीन चोरट्यांनी शेतातील शेडच्या तारा कापून आत प्रवेश करत शेत मालकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तब्बल १९ बोकड व ७ बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तिघा चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  हिंगोणे येथील परशुराम रूपला चव्हाण यांच्या शेतातच शेळी पालनासाठी लोखंडी शेड बांधलेले आहे. या शेडमध्ये १० बकऱ्या व १९ बोकड असे होते. १७ रोजी सायंकाळी ७:३० वाजता जेवण करून परशराम चव्हाण हे शेतात शेडवर झोपण्यासाठी गेले. बकरींच्या शेडचा पत्र्याचा दरवाजा आतून लावून शेडच्या बाजूस आलेल्या खाटेवर झोपले.

    रात्री २ वाजता त्यांना बकरी ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने जाग आली. त्यावेळी तिघांनी त्यांना पकडले. आणि शस्त्राचा धाक दाखवून १९ बोकड आणि सात बकऱ्या चोरून नेल्या आहेत. परशुराम चव्हाण यांनी बुधवारी ग्रामीण पोलिस स्टेशन गाठून ही आपबिती पोलिसांना सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण परदेशी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.