Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रौढाच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन केली दुखापत
    क्राईम

    प्रौढाच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन केली दुखापत

    editor deskBy editor deskSeptember 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दुचाकीच्या नुकसान भरपाईची तयारी असल्याचे दर्शविल्याचा राग आल्याने प्रौढाच्या डोक्यात लाकडी दांडुका टाकून गंभीर जखमी केले. ही घटना शाहूनगरातील मटन मार्केटमध्ये दि. १५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहरुख भिस्ती रा. भिस्ती मोहल्ला याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भिस्ती मोहल्ल्यात नासिर शब्बीर भिस्ती (वय ४५) हे वास्तव्यास आहे. त्याच परिसरात राहणारा शाहरुख भिस्ती याच्या दुचाकीचे नासिर यांच्याकडून नुकसान झाले. दरम्यान, शाहरुख भिस्ती याने नासिर यांना शिवीगाळ करीत सांगितले की, तुला माहित आहे का, माझी मोटारसायकल महाग आहे. ती घ्यायची तुझी लायकी आहे का असे म्हणत शिवीगाळ केली. त्यावर शाहरुख भिस्ती याने तुमच्या मोटारसायकलची नुकसान भरपाई करण्याची तयारी असल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने शाहरुख याने त्याठिकाणी पडलेला लाकडी दांडा उचलून नासीर भिस्ती याच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्याला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून तो तेथून पळून गेला. दरम्यान, जखमी अवस्थेत नासीर भिस्ती यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित शाहरुख भिस्ती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ अल्का वानखेडे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.