• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राजकीय चर्चेला उधान : अजित पवारांचे ३९ नेते शरद पवारांच्या संपर्कात ?

editor desk by editor desk
July 10, 2024
in Uncategorized
0
राजकीय चर्चेला उधान : अजित पवारांचे  ३९ नेते शरद पवारांच्या संपर्कात ?

पुणे : वृत्तसंस्था

अजित पवार गटाला खिंडार पडलं आहे. तब्बल ३९ पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ३९ पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. परवाच शरद पावर गटाला आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यांनतर हा ३९ नेत्यांच्या प्रवेशाने राज्यातील राजकारणावर मोठा फरक पडणार असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे या पक्ष प्रवेशाची तारीख आणि वेळीही निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे अजित पवार गटाला मोठा फटका बसणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात अजित पवार गटाला मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. अश्यात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटात छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांनी १८ नेत्यांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला. अश्यात आज राष्ट्रवादीत शरद पवार गटात ३९ नेत्यांचा प्रवेश ही महाविकास आघाडीची ताकद वाढवणार हे निश्चित आहे.

काय म्हणाले शरद पवार..
मागच्या काही दिवसांपासून पिंपरीतील काही नेते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शरद पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. यावेळी पक्षातून बाहेर गेलल्यांना परत पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, “पक्ष सोडून गेलेलं लोक परत येण्याबाबत मला कोण भेटलं नाही. पण जयंत पाटील यांना भेटले आहेत. याची मला माहिती आहे.” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

पिंपरी- चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधीही पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांना मानत होते. त्याचमुळे अनेकांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांसोबत महायुतीत जाणं पसंत केलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवारांना हा मोठा धक्का बसला आहे.

Previous Post

खळबळजनक : जळगावच्या जेलमध्ये दोन आरोपीत वाद, एकाचा खून !

Next Post

चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group