Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर चारचाकीचा अपघात
    क्राईम

    महामार्गावर चारचाकीचा अपघात

    editor deskBy editor deskJuly 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    कजगाव चाळीसगाव मार्गावरील वळण रस्त्यावर दि. ४ च्या रात्री १० वाजता चारचाकी कारचा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यानेच हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते चांदवड हा महामार्ग गेल्या चार वर्षांपासून नव्याने बनला आहे.मात्र या महामार्गावर अडथळे कायम आहेत. कजगाव-चाळीसगाव मार्गावर पाटील नगर जवळ मोठे वळण आहे. या वळणावर दिशादर्शक फलक व रात्रीचे इंडिकेटर लावणे गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने या वळणावर गेल्या चार वर्षात अनेक अपघात झाले आहेत. याच वळणावर चालकाने समयसूचकता दाखवल्याने दि.४ रोजी मोठा अपघात टळला. भाजप शहर अध्यक्ष रवींद्र पाटील, शिंदे सेनेचे तालुका संघटक विनायक राजपूत, धैर्यशील पाटील, निवृत्ती महाजन, स्वप्नील राजपूत, मुकेश पाटील, यांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना मदत केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026

    भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.