भडगाव : प्रतिनिधी
कजगाव चाळीसगाव मार्गावरील वळण रस्त्यावर दि. ४ च्या रात्री १० वाजता चारचाकी कारचा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यानेच हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते चांदवड हा महामार्ग गेल्या चार वर्षांपासून नव्याने बनला आहे.मात्र या महामार्गावर अडथळे कायम आहेत. कजगाव-चाळीसगाव मार्गावर पाटील नगर जवळ मोठे वळण आहे. या वळणावर दिशादर्शक फलक व रात्रीचे इंडिकेटर लावणे गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने या वळणावर गेल्या चार वर्षात अनेक अपघात झाले आहेत. याच वळणावर चालकाने समयसूचकता दाखवल्याने दि.४ रोजी मोठा अपघात टळला. भाजप शहर अध्यक्ष रवींद्र पाटील, शिंदे सेनेचे तालुका संघटक विनायक राजपूत, धैर्यशील पाटील, निवृत्ती महाजन, स्वप्नील राजपूत, मुकेश पाटील, यांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना मदत केली.