• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुहेरी हत्याकांडातील सातवा संशयिताला अटक

editor desk by editor desk
June 28, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
दुहेरी हत्याकांडातील सातवा संशयिताला अटक

भुसावळ : प्रतिनिधी

जुन्या वादातून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल राखुंडे यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटना २९ मे रोजी रात्री ३० वाजता घडली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सातवा फरार आरोपी सोनू रायसिंग पंडीत रा. वाल्मिक नगर, भुसावळ याला २७ जून रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजार सामिती आवारातून अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे २९ मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान भुसावळ शहरातील जुना सातारा रोडवरून रस्त्याने कारमधून येत होते. त्यावेळी जुन्या वादातून राजेश सूर्यवंशी व बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून काही हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवून त्यांच्यावर गोळीबार केल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे भुसावळ शहरात खडबड उडाली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलीसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर मारेकरी फरार झाले आहे. फरार मधील सोनू रायसिंग पंडित रा. वाल्मीक नगर, भुसावळ हा आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भुसावळ शहरातील कृषी बाजार समितीच्या आवारात येत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी २७ जून रोजी रात्री ११ वाजता पथकाने सापळा रचून फरार आरोपी सोनू पंडित याला शिताफिने अटक केली. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या सुचनेनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोहेकॉ रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, अमर आढळे, प्रशांत लाड, प्रशांत सोनार, दिनेश कापडणे, राहुल भोई यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे करीत आहे.

Previous Post

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या मिनीबसचा अपघात : १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

कार्यक्षेत्रात नवीन सहकारी मिळणार !

Next Post
कार्यक्षेत्रात नवीन सहकारी मिळणार !

कार्यक्षेत्रात नवीन सहकारी मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

जळगावात चारचाकीचा थरार : अनेक वाहनासह महिलेला दिली जबर धडक !

June 20, 2025
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

जळगावात शालकाने केली मेहुण्याची तब्बल तीन कोटींत फसवणूक !

June 20, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

भुसावळात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 20, 2025
खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group