Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरीच्या दोन दुचाकींसह दोन जणांना अटक; चाळीसगाव शहर पोलीसांची कामगिरी
    क्राईम

    चोरीच्या दोन दुचाकींसह दोन जणांना अटक; चाळीसगाव शहर पोलीसांची कामगिरी

    userBy userJune 9, 2024Updated:June 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव प्रतिनिधी । ठाणे व कल्याण येथून चोरी केलेल्या दोन दुचाकी हे चाळीसगाव शहरातील बाजार मार्केट कमिटी परिसरात विक्रीसाठी आणलेल्या दोन संशयित आरोपींना चाळीसगाव शहर पोलीसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक असे की, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीसांच्या वतीने शहरात पेट्रोलिंग करत असतांना चाळीसगाव राबविण्यात आली. त्यावेळी बेलखेडा ता. कन्नड येथील दोनजण हे चोरीच्या दोन दुचाकी बाजार मार्केट कमिटी परीसरात विक्री करीता येणार असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्याानुसार पथकाने शनिवारी ८ जून रोजी रात्री ९.३० वाजता कारवाई केली. त्यावेळी पोलीसांनी दोन संशयितांना चोरीच्या दोन दुचाकीसह अटक केली. बापुजी उर्फ लखन बळीराम राठोड वय-३५ आणि विवेक गणु आडे वय-३३ दोन्ही रा. बेलखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दोघांवर चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संदीप पाटील, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोहेकॉ अजय पाटील, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ पवन पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ मनोज चव्हाण यांचे पथकाने केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ अजय पाटील व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.