Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेततळ्यातील कापड फाडून शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान
    क्राईम

    शेततळ्यातील कापड फाडून शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान

    userBy userJune 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा प्रतिनिधी ।  पारोळा तालुक्यातील मुंदाणे शिवारातील शेतात असलेल्या १० ते १५ शेतकऱ्यांचे शेततळ्यातील प्लास्टिक पेपर फाडून चोरून नेत शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान केल्याची २ जून रोजी सकाळी उघडकीला आले आहे.  याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या संदर्भात अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे अभिमान पुंडलिक पाटील वय-६५ हे शेतकरी वास्तव्याला आहे. त्यांचे मुंडाणे शिवारातील शेत गट नंबर 102 मध्ये शेत आहे. या शेतात ते पिकांना पाणी देण्यासाठी शेततळे बनविले आहे. या शेततळ्यात प्लास्टिक पेपरचा वापर केलेला आहे. दरम्यान १ जून रोजी सायंकाळी ६ ते २ जून सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने या शेतातील प्लास्टिकचे पेपर कापून काढून नुकसान केले आहे. तसेच काही वस्तू चोरून नेले आहे. यासह याच भागातील काही १० ते १५ शेतकऱ्यांचे शेततळ्यातील प्लास्टिक पेपर काढून नुकसान केले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर शेतकरी अभिमान पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी डोंबाळे यांना देखील निवेदन दिले आहे. याप्रसंगी शेतकरी अभिमान पाटील, सुपडू पाटील, मच्छिंद्र पाटील, शरद पाटील, विठ्ठल पाटील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !

    June 10, 2026

    अमळनेरच्या डॉ. सुमित पाटील यांचा लखनऊ येथे अपघातात मृत्यू

    June 10, 2026

    लग्नातील किरकोळ वादाचे हिंसक रूप; दोन गटांत तलवारी व लोखंडी पाईपने हल्ला

    June 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.