Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेळगाव बॅरेजमधून शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन मिळणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील
    कृषी

    शेळगाव बॅरेजमधून शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन मिळणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील

    userBy userMay 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शेळगाव बॅरेज या धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, असे मागणी जळगाव तालुक्यातील धामणगाव, नांद्रा, इदगाव, खापरखेडा आवार, विदुर, डीकसाई, ममुराबाद गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील त्यांच्या निवासस्थानी शनिवारी २५ मे रोजी दुपारी २ वाजता भेट घेऊन आवर्तन सोडण्याबाबत चर्चा केली.

    यावेळी सकारात्मक चर्चा होऊन पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवर्तन सोडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेळगाव बॅरेजमधून रविवारी २६ मे रोजी सकाळी ७ आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

    यावेळी पंचायत समिती सभापती जनार्दन आप्पा, नाना पाटील, संजय भालेराव, विजय भालेराव, पंढरी भालेराव, शांताराम पाटील, प्रल्हाद पाटील, रघुनाथ महाजन, शिवाजी सपकाळे, दगडू पाटील, प्रमोद पाटील, भास्कर भालेराव, रमेश पाटील,
    संजय पाटील, बाळकृष्ण पाटील, महेश चौधरी संतोष पाटील यांच्यासह या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. यावेळी आवर्तन सुटल्यानंतर शेतकऱ्यांसाठी पिकांसाठी पाणी आणि जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.