जळगाव : प्रतिनिधी
जळगाव रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या नवी पेठ परिसरातील एका व्यक्तीवर रेल्वे पोलिसांनी गुरुवार दि.२ रोजी कारवाई केली. त्याच्याकडून ५६ ई-रेल आरक्षण तिकीट जप्त करीत रेल्वे अधिनियम कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विजयकुमार वालेचा (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. नवी पेठेतील निखिल एजन्सी नावाच्या दुकानावर पोलिसांनी धाड टाकली. विकास केदारनाथ बिर्ला (वय ६१) याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या दुकानाची झडती घेतली असता आरक्षण केलेले १ लाख ६८ हजार, ३५४ रुपये किमतीचे एकूण ५६ ई-तिकिट मिळून आले. पोलिसांनी मोबाईलसह संशयित बिर्ला याला ताब्यात घेत रेल्वे पोलीस अधिनियम कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. तपास सहायक उपनिरीक्षक एस. बी. चौधरी करीत आहेत.