यावल : प्रतिनिधी
भुसावळ ते फैजपूर रोडवर भोरटेक गावाजवळील हॉटेलच्या पुढील वळणावर एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक तेथून फरार झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ ते फैजपूर रोडवर भोरटेक गाव आहे. या गावाच्या शिवारात हॉटेलच्या पुढील वळणावर रस्त्याच्या कडेला दुचाकीसह नीलेश गंगाराम राखुंडे (१९, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) व राकेश जहारीया बारेला (२८, रा. नेपानगर, ता. जि. ब-हाणपूर) है उभे होते. त्यांना शेखर कैलास विश्वकर्मा (रा. आष्टा, ता. जि. सिहोर मध्य प्रदेश) याने कंटनेरने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नीलेश राखुंडे व राकेश बारेला दोघे जखमी झाले अपघातानंतर कंटेनर चालक तेथून फरार झाला.
याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात सागर पवार यांनी दिलेल्य फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे.



