Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात ४० लाखांचा ९८० किलो गांजा जप्त
    क्राईम

    जिल्ह्यात ४० लाखांचा ९८० किलो गांजा जप्त

    editor deskBy editor deskMarch 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    शहरापासून तीस किमीवरील सातपुड्यातील मेलाणे गावात सव्वा एकर मक्याच्या शेतात लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्याची घटना उघडकीस आली. हि कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या संशयितास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुणही दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या मेलाणे गावात सव्वा एकर शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत दुपारी शेतात धाड टाकून त्यात त्यांना मक्याच्या सव्वा एकर क्षेत्रात गांजाची लागवड केली असल्याचे आढळून आले. गांजाची कापणी करून त्याची रात्री उशिरापर्यंत मोजणी करण्यात आली. रात्री दहा वाजता गांजा भरलेला ट्रक चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासकरण्यात येत आहे.

    यांनी केली कारवाई
    चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील , पोलिस निरीक्षक कावेरी कमालकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे युनूस शेख, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने गांजा जप्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप प्रदेश माध्यम विभागात मोठा फेरबदल – राज्यभर नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर!

    April 21, 2026

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.