Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सूनेच्या प्रियकराने सासूला संपवलं
    क्राईम

    सूनेच्या प्रियकराने सासूला संपवलं

    editor deskBy editor deskMarch 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना राजस्थानमधील जोधपुर येथून समोर आली आहे. प्रेमामध्ये आडथळा ठरणाऱ्या सासुला तिच्याच सुनेने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तब्बल ८०० सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हत्येचा तपास करण्यात यश आले आहे. सध्या या हत्येच्या बातमीनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.लग्नानंतरही बायकोचं परपुरुषावरचं प्रेम या हत्येला कारणीभूत ठरलंय.

    मिळालेल्या माहितीनुसार, जोधपुकमधील बोरानाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. जिथे (ता.७)मार्च रोजी पीडित महिला संतोष कंवर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये आरोपीने सासूचा गळा दाबून तब्बल ५ वेळा गळ्यावर वार केले. या संदर्भात पीडित महिलेच्या मोठ्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात परिसरातील साधारण ८०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा जाऊन या धक्कादायक हत्येचा खुलासा करण्यात आला.यानंतर पोलिसांनी तात्काळ या हत्येतील आरोपींनी अटक केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला दोन मुलं होती,ज्यामधील लहान मुलगा गोविंग सिंह कंस्ट्रक्शनचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी गोविंद कंस्ट्रक्शन साईटवर काम करताना त्याला दुखापत झाली होती तेव्हा पासून तो आजारी असायचा. लहान मुलाची बायको आरोपी मोना कंवर(वय.३२) एक सीड कंपनीत काम करत होती. जिथे तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या आरोपी राहूल जांगिडं(वय.३२)च्या प्रेमात पडली. याचं मैत्रीचे रुपांतर पुढे जाऊन प्रेमात झाले. त्यानंतर राहुल आणि मोना वारंवार भेटत असत. त्यातच पीडित सासुने तिच्या सूनेला आणि आरोपी राहुला एकदा पाहिले होते,त्यानंतर आरोपी महिला मोनाने आपल्या सासुच्या हत्येचा कट रचण्याची योजना बनवली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    माझ्यावर एवढं प्रेम का? अमिताभ बच्चन यांचा मनाला स्पर्श करणारा ब्लॉग

    December 13, 2025

    लहान मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न; राज ठाकरेंचे फडणवीस सरकारवरल पत्र !

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.