Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात शांतता समितीची बैठक; सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा
    क्राईम

    धरणगावात शांतता समितीची बैठक; सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 2, 2026Updated:August 2, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव | प्रतिनिधी
    आगामी गणेशोत्सव, यात्रा महोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची बैठक पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

    बैठकीला शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजप्रमुख आणि पत्रकार उपस्थित होते. यावेळी वरिष्ठांकडून प्राप्त सूचनांनुसार सण-उत्सव काळात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून कोणतीही उपयुक्त माहिती तातडीने धरणगाव पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी केले.

    बैठकीत शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पी. एम. पाटील, ॲड. वसंतराव भोलाने, आर. डी. महाजन, पत्रकार रवी महाजन आणि विनोद रोकडे यांनी शहरातील विविध समस्यांवर आपली मते मांडली.

    यावेळी पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी आगामी गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

    तसेच गणेशोत्सव, यात्रा महोत्सव आणि नवरात्रोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे, तसेच विविध मंडळांनी जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे देखावे व उपक्रम राबवावेत, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी केले. पोलिस प्रशासनाने नागरिकांना कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026

    १६० कोटींच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षणाधिकारी अटकेत; SITच्या तपासाला मोठे यश

    July 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.