Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोंबड्यांच्या झुंजी लावणारे ११ जण अटकेत
    क्राईम

    कोंबड्यांच्या झुंजी लावणारे ११ जण अटकेत

    editor deskBy editor deskMarch 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुका पोलिस ठाणे हद्दीमध्ये कुन्हा या गावी एका शेताच्या बाजूला कोंबड्यांच्या झुंजी लावून सट्टा खेळणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अंमलदार सूरज पाटील यांनी हा प्रकार सुरु असल्याबाबतची माहिती डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांना दिल्यानंतर ८ रोजी यानुसार हा छापा टाकला.

    यावेळी कुन्हा शिवारात रईस बागवान यांच्या लिंबूच्या मळ्याशेजारी असलेल्या परिसरात झुडुपांमध्ये १५ ते १६ इसम हे कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर पैशांचा हार- जितचा खेळ खेळताना दिसून आले. यावेळी २००० किमतीचे २ फायटर कोंबडे, ३,६०० रुपये रोख, ६००० किमतीचे ६ मोबाइल फोन व ५,७५,००० किमतीच्या एकूण १४ मोटरसायकली असा एकूण ५,८६,६००चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी शेख सईद शेख सादिक (२३), शेख जावेद शेख हाफीज (३८), आशिष राजेश सोनी (२१), नेल्सन लेनीन पेट्रो (४३), शेख आरिफ शेख युसूफ (३१), मोसीन शेख युसूफ (३२), शेख सलमान शेख सलीम (२६), रशीद सय्यद निसार (४२), शेख शेहबाज शेख अकबर (२३), अर्जुन बादल गरड (२४), शेख इमाम शेख याकुब (३८) व इतर ५ ते ६ अनोळखी आरोपीविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक बबन जगताप, सपोनि विशाल पाटील, सहायक फौजदार विठ्ठल फुसे, पोहेकॉ युनूस शेख, संजय तायडे, प्रेमचंद सपकाळे, संजय भोई, पोना जितेंद्र साळुंखे, पोकों विशाल विचवे, जगदीश भोई तसेच सूरज पाटील, संकेत झांबरे यांनी कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात; भरधाव कारची मालवाहू वाहनाला धडक, दोघे गंभीर

    December 23, 2025

    गाईला गाडीच्या डिक्कीत कोंबून नेले चोरुन !

    December 23, 2025

    चाळीसगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर दगडफेक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.