Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
    राजकारण

    लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

    editor deskBy editor deskMarch 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    आगामी लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होवू शकते त्यापूर्वीच सर्वच पक्षांनी मैदानावर जात उमेदवारांची चाचपणी सुरु असतांना नुकतेच महाविकास आघाडीची जागावाटपा संदर्भातील महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. बैठकीत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

    मुंबईतील हॉटेल फोर सिझन्स येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.

    बैठकीत जागावाटपाचा २०-२०-८ अशा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट २० जागा आणि काँग्रेस देखील २० जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला ८ जागा देण्यात येणार आहेत.
    शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या कोट्यातून वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी २ जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली जाणार असल्याची चर्चा आहे. तर शरद पवार गट त्यांच्या कोट्यातून दोन जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षासाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

    सर्व ४८ जागांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सर्व नेत्यांना दिली. चर्चा सकारात्मक झाली असली तर येत्या ९ मार्चच्या पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सर्व पुढच्या बैठकीत ठरेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तुम्ही किती खर्च करू शकता…मुलाखती मध्ये उमेदवारांना प्रश्न..

    December 15, 2025

    मंत्री गडकरी यांचा थेट इशारा : मी देशभर हात धुवून मागे लागलो आहे !

    December 15, 2025

    महापालिका निवडणुकांचा बिगुल ; ‘या’ दिवशी होणार मतदान !

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.