Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » व्यापाऱ्याची ३३ लाखांत ऑनलाइन फसवणूक
    क्राईम

    व्यापाऱ्याची ३३ लाखांत ऑनलाइन फसवणूक

    editor deskBy editor deskMarch 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवत रमेश शंकरलाल मोर (६५, रा. पाचोरा) यांची ३३ लाख ३० हजार १०० रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारी दरम्यान घडली. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ५ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील व्यापारी असलेले रमेश मोर यांना जेसिका नामक व्यक्तीने १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी संपर्क साधून एका कंपनीच्या शेअरचे नाव सांगितले. या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यासाठी एका अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले. ते खरेदी केल्यानंतर अॅपवरील खात्यावर वाढीव रक्कम दाखवून मोर यांचा विश्वास संपादन केला.

    त्या माध्यमातून वेळोवेळी ३६ लाख १०० रुपये ऑनलाइन स्वीकारले. त्यापैकी दोन लाख ७० हजार रुपये परतावा दिला. मात्र उर्वरित ३३ लाख ३० हजार १०० रुपये न देता फसवणूक केली. या प्रकरणी मोर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.