Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : दुचाकीत तरुणीची ओढणी अडकली अन टिप्परने चिरडल
    क्राईम

    धक्कादायक : दुचाकीत तरुणीची ओढणी अडकली अन टिप्परने चिरडल

    editor deskBy editor deskMarch 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणीवर काळाने झडप घातली. दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने तरुणी अचानक खाली कोसळली. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने तिला चिरडलं. रितीका निनावे (वय २१) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रितीका निनावे ही हिंगणा येथील वाय.सी.सी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. रितीका बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या चौथ्या वर्षात शिकत होती. सोमवारी (४ मार्च) महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा आटोपून ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन वानडोंगरी परिसरातून घरी जात होती.

    त्याचवेळी रितीकाची ओढणी दुचाकीच्या चाकात अडकली. काही क्षणात रितीका जमिनीवर कोसळली. पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने तिला चिरडलं. टिप्परचे मागचे चाक रितीकाच्या अंगावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे हिंगणा- बर्डी मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.