Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटलांची एंट्री : मध्यरात्री जल्लोष !
    राजकारण

    अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटलांची एंट्री : मध्यरात्री जल्लोष !

    editor deskBy editor deskJanuary 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जालना : वृत्तसंस्था

    राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर शनिवारी २७ जानेवारी नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले. मनोज जरांगे पाटील देखील मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहचले. मुंबईतून मराठा आरक्षण घेऊनच परतल्यानंतर गावातील मराठा बांधवांनी जरांगेचं जंगी स्वागत केलं.

    यावेळी डीजेवर मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच गुलाल उधळून पेढे देखील वाटण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
    दरम्यान, मनोज जरांगे पाटील रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मराठा समाजाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला तब्बल १२३ गावातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या बैठकीत काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोन्याचा दर नव्या शिखरावर : लग्नसराईत ग्राहकांची पंचाईत !

    December 5, 2025

    भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने राज्यात तापलं राजकारण : सर्वच पक्ष देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात

    December 5, 2025

    महायुती सरकारवर वडेट्टीवारांचा हल्ला : “जनतेच्या पदरी वर्षभर निराशाच”

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.