चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील वेळोदे येथील रहिवासी संदीप प्रकाश पाटील (२६) या तरुणाचा मोहिदे गावातील शेतात वीजतारांचे काम करत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. १५ रोजी सकाळी १०: ३० ते ११ वाजेदरम्यान घडली आहे. मयत संदीप हा गत तीन वर्षापासून ठेकेदारी पद्धतीने वीज मंडळाचे रोजंदारीने मजूर म्हणून काम करीत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहिदे येथील शेतकरी सोपान बाबुराव पाटील यांच्या शेतातील खांबावरील विजेचे तार लोंबकळत होते. हे काम करत असताना विजेचा धक्का लागून संदीप पाटील हा गतप्राण झाला. तर सोबत काम करणारे समाधान रामकृष्ण पाटील (अनवर्दे), दिनेश विकास पाटील (गणपूर), ज्ञानेश्वर भगवान पाटील (अनवर्दे) हे जखमी झाले आहेत. जखमींवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती कळताच वेळोदे, मोहिदा, गणपूर आणि आसपासच्या गावांतील तरुण व नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली