Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मद्याच्या नशेत घरी जाताना दुर्दैव; आदिवासी दांपत्याचा पाण्यात बुडून अंत
    क्राईम

    मद्याच्या नशेत घरी जाताना दुर्दैव; आदिवासी दांपत्याचा पाण्यात बुडून अंत

    editor deskBy editor deskJune 12, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील  सातपुड्याच्या कुशीतील माथन या आदिवासी पाड्यावरील दांपत्याचा मद्याच्या नशेत बाजारातून घरी जाताना गाडऱ्या शिवारातील नदीच्या डोहात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दांपत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सातपुड्याच्या कुशीत माथन हा आदिवासी पाडा आहे. या पाड्यावरील रहिवासी थावरा उर्फ भावऱ्या रजान पावरा (वय ५४) व त्यांची पत्नी धोंडीबाई थावरा उर्फ भावऱ्या पावरा (वय ३२) हे दांपत्य मंगळवारी बाजार करण्यासाठी गेले होते. दरम्यान, बाजार केल्यानंतर दोघेही मद्य प्राशन करुन घराकडे निघाले होते. मद्याच्या नशेत रात्री घरी जात असताना गाडऱ्या शिवारातील पाच्या पावरा यांच्या शेताजवळील नदीच्या डोहात रस्त्याचा अंदाज न आल्याने दोघे पाय घसरून डोहात बुडाले. तर, या दोघांचा मृतदेह बुधवारी तेथील नागरिकांना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात पो.ना. वसीम तडवी करत आहे. या दांपत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सराफा दुकानात ग्राहक बनून प्रवेश; ६.४८ लाखांचे सोन्याचे पेंडल लंपास!

    June 12, 2026

    चोपड्यात बालकामगारांचे शोषण उघड; न्यू बापू टी हाऊसच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

    June 12, 2026

    महामार्गावर मध्यरात्री लुटमारीचा थरार; ‘बटाटा’सह चार सराईत गुन्हेगार अटकेत

    June 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.